Sat, June 3, 2023

एमएसईबीमधून असल्याचे सांगत
केली पावणेदोन लाखांची फसवणूक
एमएसईबीमधून असल्याचे सांगत केली पावणेदोन लाखांची फसवणूक
Published on : 7 March 2023, 8:02 am
पिंपरी, ता. ७ : एमएसईबीमधून बोलत असल्याचे सांगत वीजबिल भरण्याच्या बहाण्याने महिलेची पावणेदोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार भोसरी येथे घडला. याप्रकरणी पांजरपोळ येथील ४६ वर्षीय महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी घरी असताना त्यांना एकाने फोन केला. एमएसईबीमधून बोलत असल्याचे भासवून तुमचे वीजबिल थकल्याचे सांगत बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे फसवे संदेश महिलेला पाठवले. संदेशातील फसव्या लिंकद्वारे क्विक सपोर्ट नावाचे स्क्रीन शेअरिंग अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्याआधारे महिलेच्या बँक खात्याचे तपशील मिळवून आरोपीने महिलेच्या बँक खात्यातील एक लाख ७५ हजार ५७० रुपये प्राप्त त्यांची करून फसवणूक केली.