Tue, May 30, 2023

कंपनीतील कामाच्या आमिषाने दोन महिलांची फसवणूक
कंपनीतील कामाच्या आमिषाने दोन महिलांची फसवणूक
Published on : 7 March 2023, 9:14 am
पिंपरी, ता. ७ : कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांची आठ लाख ९० हजारांची फसवणूक केल्याचा थेरगाव येथे घडला.
थेरगाव येथील ३५ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कनिका चौहान या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी महिलेने फिर्यादीला फोन करून लिओ बरनेट मीडिया ग्रुप कंपनीमध्ये ऑनलाइन रिव्हिव्ह देण्याच्या कामाचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करून फोन पेद्वारे विविध खात्यांवर ऑनलाइन आठ लाख २५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. तसेच कलाटेनगर येथील आणखी एका महिलेला अशाच प्रकारे ६५ हजार रुपये ऑनलाइन भरायला भाग पाडून त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा परतावा न देता फसवणूक केली.