दोन लाखाचे अंमली पदार्थ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन लाखाचे 
अंमली पदार्थ जप्त
दोन लाखाचे अंमली पदार्थ जप्त

दोन लाखाचे अंमली पदार्थ जप्त

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : अफिम विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करून त्याच्याकडून दोन लाखांचे अफिम जप्त केले. ही कारवाई तळेगाव-दाभाडे येथे करण्यात आली. दिनेश रामेश्वर लाल जाट (वय २५, रा. तळेगाव दाभाडे, मूळ - राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. दिनेश हा अफिम विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन लाख ५ हजार ६०० रुपये किमतीचे ५१४ ग्रॅम अफिम, १४ हजारांचा मोबाईल व ५५ हजारांची दुचाकी असा एकूण दोन लाख ७४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिनेशने त्याचा गावाकडील साथीदार दीपक सुथार (रा. बडीसादरी, जि. चितोडगड, राजस्थान) याच्याकडून अफिम आणल्याचे समोर आले. हे अफिम दिनेश तळेगाव दाभाडे परिसरात विकायचा.