Wed, May 31, 2023

गरजूंना पुरणपोळीचे वाटप
गरजूंना पुरणपोळीचे वाटप
Published on : 8 March 2023, 9:16 am
पिंपरी, ता. ८ : प्रगती जैन महिला सोशल ग्रुप यांच्या वतीने होळीनिमित्त ''होळी करा लहान पोळी करा दान'' हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये संकलित झालेल्या पुरणपोळ्या गरजूंना दिल्या. पुरणपोळी दान करण्याचे आवाहन ग्रुपकडून करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत अनेकांनी पोळ्या दान केल्या. या उपक्रमासाठी ग्रुपच्या अध्यक्षा विजया कांते, सुजाता नवले, शैलजा वाडकर, भाग्यश्री पाटील, स्वाती शहा आदी उपस्थित होत्या. तसेच साधना सवाने, स्वाती कपिल थोरात व ममता वेलन स्वामी यांनी सहकार्य केले.