‘रंगात रंगुनी...’ संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘रंगात रंगुनी...’ संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, ता. ८ ः होळी आणि धूलिवंदनाचे औचित्य साधून कृत्रिम रंग न वापरता फुले उधळून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळातर्फे आयोजित ‘रंगात रंगुनी साऱ्या...’ या विनोदी अन् विडंबन कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आकुर्डी येथील बीना इंग्लिश मीडियम स्कूल सभागृहात कार्यक्रम झाला. तसेच, ‘विश्वगुरू भारत’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.
ज्येष्ठ एकपात्री हास्यकलाकार गजानन पातुरकर, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, सचिव माधुरी ओक, बीना एज्युकेशन ट्रस्टचे संचालक अकमलखान उपस्थित होती. गणेश भुते (बायको माझी कधी भडकेल याचा नेम नाही’, सुनंदा शिंगनाथ (मामाच्या पोरीला लागलाय लळा...) यांच्यासह आय. के. शेख, प्राची देशपांडे, अशोक कोठारी, मृण्मयी नारद, नीलेश शेंबेकर, रेखा कुलकर्णी, राजेंद्र पगारे, सुहास घुमरे, मानसी चिटणीस, रघुनाथ पाटील, प्रशांत पोरे, मनीषा पाटील, रेणुका हजारे, विवेक कुलकर्णी, संजय खोत, शोभा जोशी, योगिता कोठेकर, जितेंद्र रॉय, रफीक अत्तार, दत्तू ठोकळे आदींनी उपहासिका, हजल, लावणी, राजकीय व्यंग असे काव्यप्रकार सादर केले.

देसाई, काळे, मुळूक, गांधी प्रथम
इंद्रायणी थडी महोत्सवात घेतलेल्या ‘विश्वगुरू भारत’ विषयावरील गद्य व पद्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले. पद्य विभागात मेघा देसाई व अभिजित काळे (प्रथम), रजनी अहेरराव व हेमंत जोशी (द्वितीय), वर्षा बालगोपाल व दीपक शिंदे (तृतीय); गद्य विभागात आनंद मुळूक व सीमा गांधी (प्रथम), सुरेश इन्नानी व नेहा कुलकर्णी (द्वितीय), भाऊसाहेब गायकवाड व उज्ज्वला केळकर (तृतीय) यांना सन्मानित केले. अश्विनी कुलकर्णी, प्रा. पी. बी. शिंदे, राजेंद्र घावटे आणि विनायक गुहे यांनी परीक्षण केले. रमेश वाकनीस, अरविंद वाडकर, माधुरी विधाटे, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण यांनी संयोजन केले. संपत शिंदे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com