विविध उपक्रमांद्वारे नारीशक्तीचा सन्मान 
जागतिक महिला दिन ः विविध क्षेत्रातील महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव

विविध उपक्रमांद्वारे नारीशक्तीचा सन्मान जागतिक महिला दिन ः विविध क्षेत्रातील महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव

पिंपरी, ता. ८ ः
‘‘आदीशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणू तू
जगत जननी तू
मावळ्यांची भवानी तू
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू...
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा’’
अशा शब्दांत विविध उपक्रमांतून निरनिराळ्या क्षेत्रातील महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. शहरात वर्दीतील नारीशक्तीचा सन्मान, माता पालकांसाठी स्वसंरक्षणाचे धडे, महिला-मुलींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर अशा उपक्रमांतून महिलांचा सन्मान करण्यात आला.

वर्दीतील नारीशक्तीचा सन्मान
स्व. ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशनच्यावतीने रावेत पोलिस चौकी येथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये अंमलदार नीता टिळेकर, अश्विनी मेहता, अर्चना धाकडे, वर्षा गोरडे, मनीषा आदमाने, सुनीता तारडे, राजश्री घोडे यांना स्व. ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देवकुळे यांच्या हस्ते भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल थोरात, सलीम शिकलगार, अरुण देवकुळे आणि तुषार देवकुळे उपस्थित होते. रावेत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक परवेज शिकलगार आणि अन्य अधिकारीवर्ग यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला. कृतज्ञतापर मनोगतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


माता पालकांसाठी स्वसंरक्षणाचे धडे
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळेच्या प्राथमिक विभागात मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून ‘माता पालकांसाठी स्वसंरक्षणाचे धडे’ देण्यात आले. ‘स्वसंरक्षणाचे धडे’ या विषयावर नाट्यीकरणातून प्रात्यक्षिक स्वरूपात कार्यक्रम घेतला. यामध्ये युनिव्हर्सल मार्शल आर्ट्स या संस्थेतर्फे किरण माने, गणेश मांढरे, कारभारी गायकवाड, अभिषेक शिंदे ,स्वराज सुरवसे, नव्या पोकरे, गुरुदेवी हीरेमठ यांनी स्वरक्षणासाठी विविध प्रात्यक्षिके करून दाखविली. त्याचबरोबर नॅशनल नानचाकू फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, महेश होरे, अरबाज शेख यांनीही नाट्यकरण सादर केले. यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी रोड फाईट, शिवकालीन खेळ, लाठीकाठी, तलवार बाजी, नाईथ चाको असे कराटेची काही प्रात्यक्षिके करून दाखविली. कार्यक्रमाचे आयोजन पालक शिक्षक संघाने केले होते. यावेळी पालक संघाचे उपाध्यक्ष भिकाजी पाटील उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रतिभा पोटघन यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विठ्ठल मोरे यांनी आभार मानले. यावेळी प्रात्यक्षिक करून दाखविणाऱ्या विद्यार्थिनी व सर्व माता पालकांना गुलाबपुष्प देऊन, त्यांचा सत्कार करण्यात आला.

हिमोग्लोबिन तपासणी
मधुकर बच्चे युवा मंचवतीने डॉ. लाल पॅथ लॅब्स व पॉइंट ऑफ केअर बायोमेडिकल यांच्या सौजन्याने चिंचवड परिसरातील महिला-मुलींसाठी हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब आदी मोफत तपासणी शिबिर चिंचवड येथे घेण्यात आले. या शिबिरास परिसरातील महिलांनी-मुलींचा मोठा प्रतिसाद लाभला. शिबिरातील सहभागी महिलांना गुलाबपुष्प देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजप शहर महिलाध्यक्षा उज्वला गावडे, रोहिणी बच्चे, सुषमा कोरे, सिमरन मौलवी, प्रा. माधुरी गुरव, अर्चना बच्चे, पूजा सराफ, छाया ढेपे, रंजना बच्चे महिलांनी शिबिरास येणाऱ्या सर्व महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून सन्मान केला. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपचे शहर सचिव मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने शिबिर घेण्यात आले. पोपट बच्चे, सुधीर मगर, गिरीश हंपे, गणेश बच्चे, गणेश गावडे आदींनी शिबिर यशस्वी करण्यास योगदान दिले.

महिलांना मार्गदर्शन
ज्ञानदेव बालक मंदिर व प्राथमिक शाळा आदर्श बालक मंदिर या
शाळेमध्ये महिला पालकांसाठी विविध खेळांच्या स्पर्धां घेतल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबच्या लायन सविता निंबाळकर व संगीता रणवरे (स्वाधार अक्षर स्पर्श उपक्रम) या उपस्थित होत्या. संस्थेच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी सर्व महिला शिक्षक व पालकांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन, या दिनाचे महत्त्व सांगितले. महिलापालकांसाठी विविध खेळ स्पर्धां घेतल्‍या. विजेत्या महिला पालकांना आकर्षक बक्षीसे देण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव दिलीप चव्हाण, उपाध्यक्ष नागनाथ पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक विनोद मुळके, माधुरी कुंजीर, सुनंदा दंडवते, सरला पाटील यांनी नियोजन केले.


सायकल देऊन सत्कार
पुनावळे येथील श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या श्रीमती अनुसाई भागूजी ओव्हाळ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी दहावी वी बारावीला प्रथम क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थिनींचा सायकल देऊन सत्कार केला. अध्यक्ष प्रल्हाद ओव्हाळ, सचिव विश्वास ओव्हाळ, मुख्याध्यापक गणेश गवळी उपस्थित होते. वनिता गायधने यांचा पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. विद्यार्थिनी सानिया शेख, अस्मिता गजभारे, साक्षी कसबे, अपेक्षा पोटभरे, श्रुतिका लाळगे व रिया आंबिलढगे, वैष्णवी गोणारे या विद्यार्थिनीने अभ्यासाबद्दल प्रेरणादायी वक्तृत्व सादर केले. एक नाटिका सादर केली व शैक्षणिक ओवी म्हटली. यावेळी दीपक नेवाळे, योगेश ढावरे, दत्तात्रेय खैरनार, वनिता गायधने, रूपाली दर्शले, किरण गिरासे, प्रकाश चांदणे व राजू भालेराव आदी उपस्‍थित होते.
-----------------------------
महिला पोलिसांचा सन्मान
मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने निगडी येथील महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प, भेट वस्तू व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी महिला पोलिस निरीक्षक तेजस्विनी कदम उपस्थित होत्या. त्यांनी महिला पोलिस सहायकांचे कौतुक केले व त्यांच्या कार्याला दाद दिली. गोंदिया येथील त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तीन गावात दारूबंदी केल्याचा अनुभव कथन केला. मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयिका सुजाता बलकवडे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले. कोरोना काळात व इतर अनेक प्रसंगांमध्ये महिला पोलिसही तितकेच तत्पर राहून कार्य करतात, याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. जोत्स्ना एकबोटे, प्रमुख्याध्यापक योगेश ठिपसे, प्राचार्य प्रकाश पाबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, तसेच समन्वयक नरेंद्र चौधरी व सुजाता बलकवडे यांचे मार्गदर्शन लाभले. वंदना धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले व अनघा जोशी यांनी आभार मानले.

फोटो- 29259, 29231, 29232

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com