
''स्किल इंडिया'' अंतर्गत पिंपरीत अनोखा उपक्रम
पिंपरी, ता. १० ः विपला फाउंडेशन ही संस्था गेली काही वर्षे गरजू, अल्प उत्पन्न गटातील घरेलू कामगार, विधवा, परितक्त्या व अनेक वर्षापासून समाजातील गरजू महिलांना विविध प्रकारचे मदतीचे कार्य करत आहे. मोफत प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी महिला, गरजू मुलींना स्किल इंडिया मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे वितरणाचा कार्यक्रम नुकताच पिंपरी येथे पार पडला.
या महिला मुलींचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पिंपरी येथील संगणक प्रशिक्षण केंद्रात विशेष सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण दिले जाते. प्रा. वैशाली गायकवाड, प्रा. दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी, बारावी, पदवीपर्यंत शिकलेल्या परंतु; कोठेही जॉब नाही, अशा सर्व महिलांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सॉफ्ट स्केलिंगचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या जातात, असे विपला फाउंडेशनचे प्रा. वैशाली गायकवाड यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमाणपत्र आणि आकर्षक गिफ्ट वितरण हे अंध बांधवांच्या हातांनी देण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला अंध प्रशिक्षक अशोक भोर, प्रा. दीपक जाधव, प्रा. पार्थ कलाल, धनश्री दुर्गाडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम विपला फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
फोटोः 29343