Thur, June 1, 2023

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत
कस्तुरी, आराध्याला पदके
राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत कस्तुरी, आराध्याला पदके
Published on : 9 March 2023, 7:52 am
पिंपरी, ता. ९ ः महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठात झाली. त्यात पिंपरी-चिंचवडमधील ट्रॅक फॉर्च्युन स्पोर्ट्स क्लबच्या कस्तुरी चव्हाणने १२ वर्षाखालील मुलींमध्ये २०० मीटर आणि चार बाय १०० मीटर धावणेमध्ये सुवर्ण पदक पटकावले. तसेच तिने २०० मीटरमध्ये २७.६० सर्वोत्तम वेळ दिला. त्याबद्दल सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणूनही तिचा गौरव केला. १० वर्षाखालील मुलींच्या गटात आराध्या वाघमारे हिने १०० मीटर धावणे प्रकारात ब्रॉंझ पदक पटकावले. त्यांना प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू संदीप गायखे, तुलसीदास कोऱ्हाळे, अमित विटुळे, भगवान वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.