तळेगाव नगर परिषदेतर्फे सन्मान

तळेगाव नगर परिषदेतर्फे सन्मान

‘उत्सव महिलांचा, सन्मान नारीशक्तीचा’
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ९ : समाजात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांमधील क्षमता हा शहराचा मौल्यवान ठेवा असून विकासासाठी तो पूरक आहे. नगरपरिषद प्रशासनातील महिला अधिकारी, कर्मचारी यांची विकासकामांतील भागीदारी उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले. ‘उत्सव महिलांचा, सन्मान नारीशक्तीचा!’ या कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा फडतरे व डॉ. लता पुणे प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा ३.३ व स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२३’ अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्याधिकारी सरनाईक यांच्या हस्ते रेश्मा फडतरे यांना स्वच्छता चॅम्पियन पुरस्काराने गौरविण्यात आले. कुटुंब आणि समाजव्यवस्थेतील महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून सरनाईक म्हणाले, ‘‘आई ही स्वच्छतेची जननी आहे. पर्यावरण युक्त शाश्वत विकासाच्या कामात महिलांच्या योगदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ’’
स्त्री पुरुष समानतेच्या विविध पैलूंवर भाष्य करताना रेश्मा फडतरे म्हणाल्या, ‘‘महिलांचा सन्मान एक दिवसापुरता मर्यादित नसावा. त्यांनी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत उथळमाथ्याने जगले पाहिजे. पुरुषांकडून अपेक्षा करताना महिलांनी प्रथम स्वतः चांगले विचार केले पाहिजेत. डॉ. लता पुणे यांनी महिलांच्या सक्षमीकरणातील आरोग्याचे महत्त्व विशद केले. स्त्री जन्माचं जेंव्हा घराघरांत उत्स्फूर्त स्वागत होईल, तेव्हाच स्त्री पुरुष समानता येईल. महिलांनी आहारविहार, दिनचर्या, ऋतूचर्या, योग आणि ध्यानधारणा अंगिकरण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा काळे यांनी केले. विभा वाणी यांनी आभार मानले.


tas-9-3-23-P1-
तळेगाव दाभाडे : मुख्याधिकारी सरनाईक यांच्या हस्ते रेश्मा फडतरे यांना स्वच्छता चॅम्पियन पुरस्काराने गौरविताना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com