निगडीतील रानजाई महोत्सवात शेकडो प्रकारची फुले, फळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडीतील रानजाई महोत्सवात शेकडो प्रकारची फुले, फळे
निगडीतील रानजाई महोत्सवात शेकडो प्रकारची फुले, फळे

निगडीतील रानजाई महोत्सवात शेकडो प्रकारची फुले, फळे

sakal_logo
By

पिंपरी, ता.१० ः महापालिकेचा उद्यान विभाग आयोजित ‘फुले, फळे, भाज्या, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन’ निगडी -प्राधिकरणातील नियोजित महापौर निवासस्थान जागेवर आजपासून (शुक्रवार) सजले आहे. या रानजाई महोत्सवात शेकडो प्रकारची फुले, फळे, भाज्या आकर्षक पद्धतीने ठेवली आहेत. बागांचे नमुनेदेखील लावले आहेत. त्यामुळे येथे रंग फुलांचा आणि गंध सृजनाचा पाहायला मिळतो आहे. प्रदर्शन १२ मार्च पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

वृक्षारोपण, परसातील बाग, शोभिवंत कुंड्या, कलात्मक मांडणी, गुलाब पुष्प, हंगामी फुले, सॅलड डेकोरेशन भाज्यांचा संग्रह, निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रांचा समावेश आहे. अशा ११ विभागातील बागक्षेत्रांमधील विविध स्पर्धेत उद्योग समूहांनी सहभाग घेतला. होता. विजेत्यांना प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व बक्षीस देण्यात आले. महोत्सवामध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी विशेष लाइव्ह बँड, विदूषकाचे प्रयोग, लाइव्ह पेंटिंगचे सादरीकरण तसेच वेगवगळ्या प्रकारची फुले, फळे, झाडांची रोपे खरेदी व विक्रीसाठी आहेत.

महोत्सवाचे उद्घाटन आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, माजी उपमहापौर शैलजा मोरे, उपआयुक्त रविकिरण घोडके, सुभाष इंगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, उद्यान अधिक्षक गोरख गोसावी आदी उपस्थित होते.
--
फुलांसोबत सेल्फी
असंख्य फुले एकाच ठिकाणी पाहायला मिळत असल्याने नागरिक प्रदर्शनाला भेट देत आहेत. प्रत्येकजण प्रदर्शनात ठिकठिकाणी सेल्फी घेताना पाहायला मिळाले.