शास्तीमाफीचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार

शास्तीमाफीचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार

पिंपरी, ता.१० ः अवैध बांधकामावरील शास्ती माफीची निर्णय राज्य सरकारकडून नुकताच घेतला आहे. मात्र, आर्थिक वर्ष संपण्यासाठी कमी कालावधी राहिला आहे. परिणामी नागरिकांना मूळ कर भरण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून महापालिकेने महत्त्वाच्या विभागामध्ये कॅश काऊंटर वाढविली आहेत. त्यांना जादा वेळ दिली आहे. तसेच ऑनलाइन स्वरूपात सुद्धा माफीचे प्रमाणपत्र मूळ कराचा भरणा केल्यानंतर उपलब्ध करून दिले आहे.

मूळ कराचा भरणा केल्यानंतर शास्ती माफी होणार असल्याचे शासन अध्यादेशात नमूद करण्यात आले. नागरिकांनी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी www.pcmcindia.gov.in या लिंकद्वारे आपली सर्व माहिती भरावी. त्यानंतर मूळ कराचा भरणा केला नसल्यास विविध पर्यायाद्वारे भरणा करावा. ज्यांनी यापूर्वी भरणा केला आहे, त्यांनी आपली माहिती भरून प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com