पवनमावळात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवनमावळात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्साहात
पवनमावळात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्साहात

पवनमावळात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्साहात

sakal_logo
By

सोमाटणे, ता. ११ ः पवनमावळात ढोल, ताशांच्या गजरात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शिरगाव, गोडुंब्रे, गहुंजे, साळुंब्रे, सांगवडे, कुसगाव, पाचाणे, पुसाणे, दिवड, ओवळे, चांदखेड, दारुंब्रे, आढले, शिवली, धनगव्हाण, येलघोल, आर्डव, शिवणे, मळवंडी आदी गावात उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा झाला. यानिमित्त शिवप्रेमीच्या वतीने मावळी वेश परिधान करून शिवनेरी, सिंहगड, पुरंदर, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कोराइगड, राजमाची या किल्ल्यावरून ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात, जय शिवाजी जय भवानी च्या जयघोषात शिवज्योत आणल्या होत्या. या शिवज्योतींचे प्रत्येक गावात गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. गहुंजे येथील राज्यातील दुर्मिळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दारुंब्रे येथे छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवज्योतीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी गावातून पालखी मिरवणूक व विविध पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री महिलांच्या वतीने पाळणा गीत म्हणत शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला. सोमाटणे येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने शिवसेना कार्यालयातील छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुक काढण्यात आली.

Smt10Sf5.