फुलांच्या प्रदर्शनाला गर्दीचा बहर

फुलांच्या प्रदर्शनाला गर्दीचा बहर

पिंपरी, ता.११ ः मनाला मोहवून टाकणारा फुलांचा टवटवीतपणा, आबालवृद्धांना आकर्षित करणारी नानाविध जातीची रंगीबेरंगी फुले, वेस्ट टू वंडर अंतर्गत तयार करण्यात आलेली शिल्पे...अतिशय सुबक पुष्परचना यामुळे २६ व्या पुष्प प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी गर्दीला बहर आला. फुलांच्या आगळ्या दुनियेविषयी प्रत्येकाला उत्सुकता असल्याचे दिसले. फुलांची माहिती घेता घेता अनेकांनी दुर्मिळ वनस्पतींच्या रोपांची खरेदी केली. महापौर निवासस्थान, निगडी प्राधिकरण येथे आयोजित हा ‘फ्लॉवर शो’ नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे.

फुलांच्या दुनियेची सैर
महापालिकेच्या विभागाने तीन दिवसीय उद्यान स्पर्धा व पुष्पप्रदर्शन भरविले आहे. शनिवारी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सकाळपासूनच गर्दी राहिली. अनेकजण सहकुटुंब आले होते. दुपारनंतर गर्दीला बहर आला. लहान मुलांचा उत्साह अधिक होता. फुलांची, रोपांची मांडणी लक्षवेधी आहे. ‘वेस्ट टू वंडर’ अंतर्गत तयार केलेली शिल्पे पाहण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी गर्दी आहे. प्रसिद्ध आर्टिस्ट अजय लोळगे यांच्या कॅनव्हास पेंटींगवर आपल्या हाताचे ठसे उमटविण्याची संधी घेतली जात आहे. येथे चार्ली चॅप्लिन, जग्लर्स, फन फेअरही आहे.

औद्योगिक कंपन्‍यांनी प्रदर्शनात सहभाग
विविध नर्सरी, औद्योगिक कंपन्‍यांचा प्रदर्शनात सहभाग आहे. मुख्य ठिकणी प्रवेश करताच विविध जातीच्या गुलाबांची फुले नजरेत भरतात. वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित कलाकृती प्रदर्शनाचे वेगळेपण आहे. रोपे, खत, उद्यान निर्मितीसाठी आवश्यक साहित्यांच्या स्टॉलवर गर्दी होती. पर्यावरणपूरक झाडांची कुंडी, लाकडापासून बनविलेल्या कलाकृती प्रदर्शनात आहेत. काही फुलांचा उपयोग औषधी आणि स्वयंपाकासाठीदेखील केला जातो. देशभरातील फुलांच्या जाती आश्चर्यकारक आहेत आणि त्यात असलेले गुणधर्म आणि वैशिष्ट्ये बघायला मिळतात. उद्यान विभागातील पर्यवेक्षक आणि माळी यांनी ओंडक्यांच्या वेगवेगळ्या आकृती तयार करून प्रदर्शन आकर्षक होण्यास हातभार लावला आहे.

--
कोट
‘‘अतिशय सुंदर प्रदर्शन आहे. रोपटी, फुलझाडे लावण्यास प्रेरणा मिळते. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. प्रदर्शन म्हणजे जणू काश्मीरमध्ये आलो आहोत असा भास होतो आहे. यासाठी अतिशय मेहनतीने नियोजन केलेल्या महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्‍यांना आमचा सलाम आहे’’
-सुनील व सुजाता देशमाने, प्राधिकरण, निगडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com