
दस्त नोंदणीसाठी आर्थिक लूट
दस्त नोंदणीसाठी आर्थिक लूट
पिंपरी, ता. ११ : पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील काही नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणीसाठी आर्थिक लूट सुरु असल्याची तक्रार नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ॲड. बाळासाहेब थोपटे यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, काही कार्यालयात पैसे घेऊनच दस्त नोंदणी केली जात आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात सरकारी मोजणी झालेले तसेच गुंठेवारी झालेले खरेदीखताच्या दस्त नोंदणीसही अधिकारी नकार देतात. आवश्यक ती सर्व कागदपत्रे असताना कायदेशीर मार्गाने होणाऱ्या नोंदणीसाठी पैसे उकळण्याच्या हेतूने अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जाते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी याबाबत त्वरित चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी थोपटे यांनी केली आहे.
------------------