जाधववाडी धरणामध्ये 
तरूणाचा बुडून मृत्यू

जाधववाडी धरणामध्ये तरूणाचा बुडून मृत्यू

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १२ ः तळेगावजवळील भंडारा डोंगराच्या पायथ्याशी जाधववाडी धरणामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. हमूद अनारुद्दीन खान (वय २१ ) असे मृत तरुणाचे नाव असून, तो त्याच्या नातेवाईकांसह जाधववाडी धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी आला होता.
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील फौजदार पंडित अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ११) हमूद त्याच्या नातेवाईकांसह जाधववाडी धरणामध्ये पोहण्यासाठी उतरला होता. त्याला जास्त पोहता येत नसल्यामुळे तो कडेलाच पोहत होता. थोड्यावेळाने पाण्यातील सर्वजण बाहेर आले परंतु हमूद पाण्यातच थांबला. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. एनडीआरएफ व वन्यजीव मावळ संस्थेच्या नीलेश गराडे, गणेश निसाळ, भास्कर माळी, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, कुंदन भोसले, शुभम काकडे, सार्थक घुले, अनिश गराडे, गणेश गायकवाड, गणेश ढोरे, कुणाल दाभाडे यांनी सुमारे चार तासाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह पाणी बाहेर काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com