महापालिकेचा ई अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेचा ई अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर होणार
महापालिकेचा ई अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर होणार

महापालिकेचा ई अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर होणार

sakal_logo
By

पिंपरी, ता.१२ ः महापालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ई-अर्थसंकल्प मंगळवारी (ता.१४) सादर होणार आहे. पंचवार्षिक सभागृहाचा कालावधी संपल्यामुळे वर्षभरापासून प्रशासक कामकाज पाहत आहेत. त्यामुळे संपूर्णपणे शेखर सिंह यांची छाप असणारा हा अर्थसंकल्प असेल. त्यामुळे याबाबत नागरिकांमधून उत्सुकता आहे.

गेल्यावर्षी एकूण ४ हजार ९६१ कोटी ६५ लाख व केंद्र शासन व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनेसह ६ हजार ४९७ कोटी २ लाख रुपयांचे महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले होते. नव्या अर्थसंकल्पावर नोव्हेंबर २०२२ पासून काम सुरू आहे. यासाठी सर्व विभागांकडून सुधारित व नवीन अर्थसंकल्पातील खर्चाबाबत आढावा घेण्यात आला आहे. नागरिकांच्या सूचनाही मागविण्यात आल्या. तसेच स्मार्ट सारथीवर कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे याबाबत लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. यंदाचा दुसरा ई-अर्थसंकल्प असणार आहे.

प्रशासक सिंह यांचा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे आरोग्य, शिक्षण, रस्ते, ड्रेनेज, उद्यान, कचरा व्यवस्‍थापन क्रीडा याबाबींना किती प्राधान्य असणार, करवाढ होणार का याबाबत उत्सुकता आहे. सलग दोन वर्षे कोरोनामुळे निधीअभावी नवीन आणि जुन्‍या कामांना ब्रेक लागला होता. जुने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे.

महापालिकेत प्रशासकीय कारभार असल्याने स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मंजुरी आयुक्तच देणार आहेत. त्यांच्या सहमतीनेच तो लागू होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता आहे. अर्थसंकल्पासाठी मंगळवारी विशेष सभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, यांनी दिली.