भिंत अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिंत अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू
भिंत अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

भिंत अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

sakal_logo
By

चिखलीत भिंत अंगावर कोसळून
नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

पिंपरी, ता. १३ : बंगल्याची सीमाभिंत अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चिखली गावठाण येथे घडली.
मोहितराजे अमित भोसले (रा. देहू-आळंदी रोड, चिखली गावठाण) असे या घटनेत मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याचे वडील अमित भोसले यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश विठ्ठल जाधव (रा. स्पाईन रोड, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचा चिखली गावठाण येथे बंगला असून या बंगल्याची सात ते आठ फूट उंचीची सीमाभिंत एका बाजूला झुकलेली होती. दरम्यान, मोहितराजे हा भिंतीलगतच्या रस्त्याने जात असताना ही भिंत त्याच्या अंगावर कोसळली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही भिंत दुरुस्त करण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, मोहितराजे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी जाधव याला अटक केली आहे.
मोहितराजे निगडीतील एका खासगी शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत होता. वडील चिंचवड येथील खासगी रुग्णालयात नोकरीला असून आई गृहिणी आहे.

आईच्या डोळ्यासमोरच घडली घटना
घटनास्थळापासून काही अंतरावरच भोसले कुटुंब राहते. भिंत कोसळली यावेळी काही अंतरावरच मोहितराजे याची आई होती. पोटचा गोळा ढिगाऱ्याखाली अडकल्याचे पाहिल्यानंतर आईने टाहो फोडला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोहितराजे याला तत्काळ बाहेर काढले. तो गंभीर जखमी झाला होता.