नागरीकांच्या हिताचे व मुलभूत प्रश्‍नांचे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला : शेखर सिंह

नागरीकांच्या हिताचे व मुलभूत प्रश्‍नांचे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला : शेखर सिंह

‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत माजी आयुक्त व प्रशासक राजेश पाटील व माझ्या अशा एकूण वर्षभराच्या काळात आम्ही नागरिकांच्या हिताचे व मूलभूत प्रश्‍नांचे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. आंद्रा धरणाचे १०० एमएलडी पाणी आणून, चिखली येथील शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण केला. भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक बीआरटीएस रस्त्याचे काम मार्गी लावले. पिंपरीतील डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचे काम मार्गी लावले. महापालिकेच्या नवी इमारतीचा विषय मंजूर केला. वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प मार्गी लावला. उद्योगनगर असल्याने शहरातील उद्योगांसाठी सीएसआर कक्ष व उद्योग सुविधा कक्ष सुरु केला. तृतीयपंथीयांसाठी महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी दिली. महिला बचत गटांना स्वयंरोजगार देण्यासाठी नवी दिशा उपक्रम सुरु केला. शहराच्या सुशोभीकरणासाठी शिल्प उभे केले. शिक्षणाचा जल्लोष उपक्रम राबविला. आंतररराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरु केले. विज्ञान केंद्रात तारांगण उभारणी केली. मासुळकर कॉलनीत डोळ्यांचे रुग्णालय उभे केले. कै. अटलबिहारी वाजपेयी उद्यानाची उभारणी केली. यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे काम सुरु केले. ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरणाचे ९० टक्के काम पूर्णत्वास आणले.
- शेखर सिंह, प्रशासक तथा आयुक्त, पिंपरी महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com