
दर्जेदार आरोग्य सेवेसाठी ‘सोशल इम्पॅक्ट बॉंड’
पिंपरी, ता. १४ : महापालिकेच्या वतीने कर्करोग (कॅन्सर) रुग्णालय सार्वजनिक खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. तालेरा रुग्णालयात मल्टिस्पेशालिटी सेवा, वृद्धांसाठी रुग्णालय प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सामाजिक प्रभाव बॉंड (सोशल इम्पॅक्ट बॉंड) च्या माध्यमातून आरोग्य सेवांच्या दर्जा वाढवून सर्व रुग्णालये व दवाखाने ‘एनएबीएच’ प्रमाणित करण्याचेही प्रस्तावित आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (ता. १४) दिली.
या वैद्यकीय सुविधा प्रस्तावित
- महापालिका नवीन ए. आय. तंतत्रज्ञानाचा वापर करून स्क्रीनिंग व निदान सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार
- पीपीपी तत्त्वावर कर्करोग रुग्णालय
- मासूळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालय लवकरच सुरू करणार
- तालेरा रुग्णालयात मल्टिस्पेशालिटी सेवा
- तालेरा रुग्णालयात वृद्धांसाठी रुग्णालय
- थेरगाव रुग्णालयात ट्रामा सेंटर, पूर्ण क्षमतेने सर्जरी
- थेरगाव रुग्णालयात नेत्रविभाग, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया विभाग
- कै. प्रभाकर कुटे रुग्णालयात डायलिसिस, सर्जरी, अस्थिरोग विभाग
- वायसीएम रुग्णालय अद्ययावत करणे
- महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये दंत चिकित्सा सुविधा
- वायसीएम रुग्णालयात अद्ययावत दंत उपचार सुविधा