आकुर्डीत सुरक्षा सप्ताहाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकुर्डीत सुरक्षा सप्ताहाची सांगता
आकुर्डीत सुरक्षा सप्ताहाची सांगता

आकुर्डीत सुरक्षा सप्ताहाची सांगता

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः बजाज ऑटो आकुर्डी येथे ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षा स्पर्धांचे आयोजन केले. ४ मार्च ते १० मार्च २०२३ या कालावधीत हा सुरक्षा सप्ताह पाळण्यात आला. त्याचा पारितोषिक वितरण सोहळा सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय संजय गिरी यांच्या हस्ते व श्रीमती तृप्ती कांबळे, उपसंचालक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या उपस्थितीत झाला. बजाज ऑटो आकुर्डी येथे राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाचे विविध प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. उंचीवरील कामातील सुरक्षितता, अग्निशामक प्रशिक्षण, प्रथमोपचार इत्यादींचा यात समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात सुरक्षा शपथ घेऊन झाली. यावेळी गिरी यांनी सुरक्षा दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. बजाज ऑटोने केलेल्या सुरक्षा वाढीच्या कार्याचे कौतुक केले. नवीन निझावान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. यशवंत लोंढे यांनी आढावा घेतला. फॅक्टरी मॅनेजर संजय खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन सेफ्टी विभागाचे श्रीनिवास साळुंखे व सागर चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विकास मुळीक व मिलिंद बिरादार यांनी प्रयत्न केले.