असाह्य महिलांना किराणा साहित्य भेट

असाह्य महिलांना किराणा साहित्य भेट

पिंपरी, ता. १५ ः दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही जिद्दीने घरकाम आणि मोलमजुरी करून प्रपंच चालविणाऱ्या महिलांना जागृत नागरिक महासंघाने किराणा साहित्य भेट दिले. पालक नसलेल्या अठरा वर्षांखालील मुलांना पौष्टिक आहाराचे वाटप केले. याचा लाभ तीस महिला व वीस मुलांनी घेतला. महापालिका जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन यादव, उपाध्यक्ष राजेश्वर विश्वकर्मा, खजिनदार रोहिणी यादव, शहरप्रमुख अशोक कोकणे, प्रकाश पाटील, दत्तात्रेय काजळे, नीलिमा भागवत, राजश्री शिर्के आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या आशा घोडके आणि सुरेखा रणदिवे यांनी स्वानुभव कथन केले. राजाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. महासंघाचे सचिव उमेश सणस यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com