Tue, March 28, 2023

रेशन दुकानदारांचे आज धरणे आंदोलन
रेशन दुकानदारांचे आज धरणे आंदोलन
Published on : 15 March 2023, 3:18 am
पिंपरी, ता.१५ ः ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनच्यावतीने उद्या(गुरूवार) देशव्यापी लाक्षणिक धरणे आंदोलन होणार आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वितरण प्रणाली विक्रेते त्यांची ई-पॉश मशीन बंद ठेवणार आहेत, अशी माहिती संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता यांनी दिली. ‘वन नेशन, वन वर्क, वन कमीशन’ अंतर्गत, सार्वजनिक वितरण प्रणाली विक्रेते सरकारी नोकर म्हणून घोषित केले जावे. सरकारी नोकर घोषीत करण्यात काही अडथळे येत असतील तर दरमहा ५५ (पन्नावन्न) हजार रुपये मानधन देण्यात यावे. अडथळा असल्यास (प्रत्येक विक्रेत्याला ३००० (तीन हजार) युनिट वाटप करून) प्रति क्विंटल ४६० (चारशे साठ रुपये) कमिशन या दराने दिले जावे. सर्व्हरच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात आदी मागण्या संघटनेच्या आहेत.