
पालिकेतर्फे महिलांसाठी स्वच्छोत्सव व स्पर्धा
पिंपरी, ता. १५ ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी शहराच ३० मार्चपर्यंत स्वच्छोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यात वुमन आयकॉन लिडिंग स्वच्छता अवार्ड (विन्स), स्वच्छता जागृती फेरी, स्वच्छता शपथ आणि शून्य कचरा उपक्रम राबविले जाणार आहेत. महिला बचतगट, मायक्रो एन्टरप्रायजेस, नवोदित उद्योजिका, स्वयंसेवी संस्था, वुमन एन्टरप्रेनीयर्स व चेंज एजन्टस आदी श्रेणीत स्वच्छतेविषयक कामकाज करणाऱ्या महिला सहभागी होऊ शकतात. स्पर्धेच्या प्रवेशिका महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धकांनी sbm2020@pcmcindia.gov.in या ई-मेल अथवा जवळच्या क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाकडे प्रवेशिका सादर कराव्यात. प्रवेशिका भरण्याची मुदत पाच एप्रिलपर्यंत आहे. सर्वोत्तम प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.