
अत्यावश्यक सेवा सुरळित ठेवा ः सिंह
संप जोड
---
अत्यावश्यक सेवा सुरळित ठेवा ः सिंह
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे. या संप काळात महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या आपत्कालीन सेवा कोणत्याही परिस्थितीत बाधित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असा आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना बुधवारी दिला. संपाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा प्रभावित झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनाबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका भवनात बैठक झाली. त्यात त्यांनी आढावा घेऊन अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह वैद्यकीय, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, आरोग्य, विद्युत, अग्निशमन, सुरक्षा आणि पर्यावरण विभागासह सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, संजय कुलकर्णी, संजय खाबडे, श्रीकांत सवणे, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, वामन नेमाने, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.