
चांदखेड पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी
सोमाटणे, ता. १६ ः कासारसाई- चांदखेड- बेबडओहोळ रस्त्यावरील रखडलेले चांदखेड पूल व चंदनवाडी घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम करावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे.
दोन वर्षांपूर्वी कासारसाई, चांदखेड, बेबडओहोळ या रस्त्याचे रुंदीकरण व खडी, डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. या रस्त्याचे काम करताना धोकादायक व अपघातग्रस्त असलेल्या आढले नदीवरील चांदखेड पूल बांधणीचे व चंदनवाडी घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम आधी करणे गरजेचे होते. परंतु संबंधित विभागाने हे काम न करता आधी
कासारसाई ते बेबडओहोळ या रस्त्याचे रुंदीकरण व खडी डांबरीकरणाचे काम पूर्ण करून, धोकादायक चांदखेड पूल व चंदनवाडी घाटातील रस्त्याचे काम अपूर्ण ठेवले. त्यामुळे गेल्या दोन वर्षात येथे अनेक अपघात झाले आहेत. रात्रीचे या रस्त्याने प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले असून, दुचाकीस्वारांना या ठिकाणाहून जीव
मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. हे दोन्ही ठिकाण अपघातग्रस्त असल्याने संबंधित विभागाने येथे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी रिंगरोड शेतकरी कृती समितीने केली आहे.
फोटो ः३०९२१
--------------------------------------------------------------------------------------------