अपहरण करून ऐवज लुटल्याप्रकरणी भोसरी, हिंजवडीत तिघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहरण करून ऐवज लुटल्याप्रकरणी 
भोसरी, हिंजवडीत तिघांवर गुन्हा
अपहरण करून ऐवज लुटल्याप्रकरणी भोसरी, हिंजवडीत तिघांवर गुन्हा

अपहरण करून ऐवज लुटल्याप्रकरणी भोसरी, हिंजवडीत तिघांवर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : शिवीगाळ व मारहाण करीत अपहरण करून ऐवज लुटल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरी व हिंजवडी येथे घडला. विकास महादू दरवडे (रा. मु. पो. उढाणे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र बाबूराव निकम (वय ३८, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी) व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. पैशांच्या व्यवहारावरून आरोपी हे फिर्यादीच्या ऑफिसमध्ये आले. त्यांना शिवीगाळ, मारहाण करून जबरदस्तीने मोटारीतून हिंजवडी येथे घेऊन गेले. पाच हजार रुपये रोख व ३४ हजार ६०० रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर करून घेतले. फिर्यादीच्या हातातील हिरेजडित चांदीच्या चार अंगठ्या व क्रेडिट कार्ड काढून घेतले. फिर्यादीच्या भावाच्या नावे असलेली मोटार ताब्यात घेतली. फिर्यादीला मारण्याची भीती घालून मोटारीच्या पेपरवर त्यांची सही घेतली. हा प्रकार दोंदेकर ऍग्रो सोल्यूशन प्रा. ली. एलोरा शॉपिंग सेंटर, इंद्रायणीनगर,मी भोसरी व हिंजवडी येथे घडला.

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : भरधाव दुचाकीच्या धडकेत दुसऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. महादेव बबन कान्हूरकर (वय ४२) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. कान्हूरकर हे त्यांच्या दुचाकीवरून पुणे-नाशिक महामार्गावरील जय गणेश साम्राज्य चौक येथील स्पाईन रस्त्याने खडी मशीनकडे जात होते. दरम्यान, भोसरीकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने कान्हूरकर यांचा मृत्यू झाला.

फोटो व्हायरलची धमकी देत उकळले पैसे
अल्पवयीन मुलीसोबतचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीच्या वडिलांकडून पैसे उकळले. मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार माणगाव येथे घडला. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोशन कैलास चव्हाण (वय २५, रा.फेज-तीन, माणगाव, ता. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीच्या पंधरा वर्षीय मुलीचे अश्लील फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडून पाच हजार रुपये घेतले. फिर्यादीच्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. आरोपीने मुलीसोबतचे अश्लील फोटो स्नॅपचॅट करून फिर्यादीला पाठवले.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार
पिंपरी : महिलेचे अश्लील फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केले. हा प्रकार खेड, भोसरी येथे घडला.
याप्रकरणी नीलेश अमृत मोरे (वय ३०, रा. मोई, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीचे काही अश्लील फोटो काढून ते फोटो महिलेला दाखवले. हे फोटो व्हायरल करण्याची किंवा पतीला दाखविण्याची धमकी देत आरोपीने पीडितेवर अत्याचार केले.