‘डॉ. विश्वनाथ कराड करंडक’ महोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डॉ. विश्वनाथ कराड करंडक’ महोत्सव उत्साहात
‘डॉ. विश्वनाथ कराड करंडक’ महोत्सव उत्साहात

‘डॉ. विश्वनाथ कराड करंडक’ महोत्सव उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः एमआयटी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, आळंदीमधील नादब्रह्म सांस्कृतिक कक्षातर्फे ‘डॉ. विश्वनाथ कराड करंडक’ महोत्सव घेण्यात आला. या अंतर्गत नृत्य, गायन आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यात विविध महाविद्यालयातील ७९ विद्यार्थी सहभागी झाले होते.

निकाल असा ः वैयक्तिक नृत्य ः अभिषेक जाधव (अजिंक्य डॉ. डी. वाय. पाटील), प्रज्ञा रोडे (आरजेएसपीएम), यश तावडे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ). समूह नृत्य ः एमएमएमआयटी व एमआयटी एसीएससी, आळंदी. गायन ः साई नारायण स्वामी (डॉ. डी. वाय. पाटील), सिद्धांत रोठे (वाय. सी. लॉ कॉलेज). वक्तृत्व ः जया मिश्रा (एमआयटी एसीएससी आळंदी), साईराज घाटपांडे (श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज) व आकाश जांगीड (एमआयटी एसीएससी आळंदी). विजेत्यांना रोख रक्कम, पारितोषिक आणि प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेत एमआयटी एसीएससी-आळंदी, डॉ. डी.वाय. पाटील एसीएस कॉलेज,-पिंपरी, गरवारे कॉलेज-पुणे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग-पुणे, सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स-आंबेगाव, एमआयटी एओइ कॉलेज, बीजेएस कॉलेज- वाघोली, यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, टीसी कॉलेज-बारामती, श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी-सुदुंबरे, तक्षा इन्स्टिट्यूट, प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेज, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, एमएमआयटी कॉलेज यांनी भाग घेतला.

परीक्षक म्हणून शंतनू लाकल, आशुतोष सुरजुसे, संत ज्ञानेश्वर डी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकल यांनी केले. उप प्राचार्या डॉ. मानसी अतितकर यांनी स्वागत केले. डॉ. बी. बी. वाफारे यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कक्ष विभाग प्रमुख अमित ताले यांनी नियोजन केले. डॉ. अर्चना आहेर यांनी सूत्र संचालन केले.