आरटीई ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत वाढ द्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई ऑनलाईन अर्ज 
भरण्यास मुदत वाढ द्यावी
आरटीई ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत वाढ द्यावी

आरटीई ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत वाढ द्यावी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक हक्क (आरटीई) ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची तारीख १७ मार्च २०२३ आहे. या वर्षीच्या नियमावलीमध्ये आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत, अशी अट दिली आहे. विविध आंदोलनांमुळे नागरिकांना अर्ज भरताना त्रास होत आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख मुदतवाढ देऊन ३१ मार्च २०२३ पर्यंत करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केली आहे.
या वर्षी जानेवारीपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया दोन महिने उशिरा सुरू झाली आहे. ऑनलाइन संकेतस्थळावर अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणीमुळे खूप वेळ लागतो. तातडीने कागदपत्रे सादर करताना उत्पन्नाचे व जात वैधता प्रमाणपत्रे मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. किमान दोन आठवड्याची अंतिम मुदतवाढ शासनाने दिली तर सर्व गरजू पाल्यांना आरटीई प्रवेशाचा लाभ घेता येईल, असे बेंद्रे यांनी निवेदनात म्हटले आहे.