मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात हिवाळी श्रमसंस्कार शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात हिवाळी श्रमसंस्कार शिबिर
मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात हिवाळी श्रमसंस्कार शिबिर

मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात हिवाळी श्रमसंस्कार शिबिर

sakal_logo
By

पिंपरी, ता.१९ : मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत देहूगावात झाले. या शिबिरांतर्गत स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलनचे आयोजन करण्यात आले. विविध व्याख्यात्यांच्या व्याख्यान झाले. त्यामध्ये फुलपाखरू संवर्धन, योग आणि ताण-तणाव व्यवस्थापन, निर्भय कन्या अभियाना अंतर्गत स्वसंरक्षण या विषयांचा समावेश होता. त्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गावातील जनतेचे आरोग्य विषयक आणि डिजिटल व्यवहार ज्ञान याबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. स्वयंसेवकांनी मंदिरात आलेल्या भाविकांशी संवाद साधला व मंदिरातील साफसफाई केली व त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
शिबिराचे उद्‍घाटन श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त संजीव महाराज मोरे यांच्या हस्ते झाले. स्वयंसेवकांतर्फे गावातील लोकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रशांत महाराज मोरे, डॉ. स्वप्नील चोधरी, प्रदीप कदम उपस्थित होते. आयोजन डॉ. लीना सुनील मोदी, कार्यक्रम अधिकारी प्राचार्या डॉ. विनिता बसंतानी यांनी केले.