बाल विद्यार्थ्यांनी सादर केल्या संगीतावर नृत्य अन् नाटिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल विद्यार्थ्यांनी सादर केल्या
संगीतावर नृत्य अन् नाटिका
बाल विद्यार्थ्यांनी सादर केल्या संगीतावर नृत्य अन् नाटिका

बाल विद्यार्थ्यांनी सादर केल्या संगीतावर नृत्य अन् नाटिका

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : चऱ्होली येथील मानिनी इंद्रधनू बहुउद्देशीय शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या स्टारडम इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झाले. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि निमंत्रित उपस्थित होते. बाल विद्यार्थ्यांनी संगीतावर आधारित वेशभूषा, नृत्य, नाटिका सादर केल्या.
माजी महापौर नितीन काळजे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. संजय पवार, प्राचार्या जयश्री टांगतोडे, माजी नगरसेविका विनया तापकीर, चित्रपट कलाकार प्रीतम पाटील, अध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, सेक्रेटरी अंजली म्हस्के उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. गणेश वंदना सादर झाली. विज्ञान प्रदर्शनात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. त्यामध्ये प्रथम भार्गवी शिंदे, सर्वेश मधाले, पृथ्वीराज देसाई, संस्कृती अहिरे, दूर्वा साखरे, पार्थ तापकीर तर, द्वितीय क्रमांक कृष्णा गौड, अवनी शिंदे, अर्णव गोंनाळे, वेदांश राऊळ, रुद्र मोरे, कबीर शिवले, उत्कर्ष सिंघानिया यांना मिळाला. शाळेचा सातवा वार्षिक अहवाल सादर झाला. सूत्रसंचालन ॲड. वनिता मीठा यांनी केले.