‘अलार्ड इन्स्टिट्यूट’मधील शिबिरात ४५० जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अलार्ड इन्स्टिट्यूट’मधील
शिबिरात ४५० जणांचे रक्तदान
‘अलार्ड इन्स्टिट्यूट’मधील शिबिरात ४५० जणांचे रक्तदान

‘अलार्ड इन्स्टिट्यूट’मधील शिबिरात ४५० जणांचे रक्तदान

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० : अलार्ड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट येथे १३ मार्च रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराला प्रतिसाद देत ४५० विद्यार्थ्यांनी या रक्तदान
शिबिरामध्ये उत्साहाने भाग घेतला. ५० पिशव्या रक्त संकलित झाले. हे शिबिर रोटरी अँड रोटारॅक्ट क्लब ऑफ पुणे, वारजे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले होते. सद्‍गुरू सेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे ‘आधुनिक काळातील महिला आरोग्य समस्या आणि निवारण’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. डॉ. एस. एन. तलबार, डॉ. पद्मा झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष श्रीकांत साळुंखे, अध्यक्ष प्रभंजन नलावडे यांच्या साह्याने हे शिबिर झाले. डॉ. एल. आर. यादव, डॉ. आर. एस यादव, डॉ. बी. पी जोशी, डॉ. डी. के. त्रिपाठी यांनी या कार्यशाळेचे व सहयोजकांचे कौतुक केले.