
जप्ती केलेल्या साहित्याचा ढीग
पिंपरी, ता. १९ ः महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील विविध भागात अनधिकृत फेरीविक्रेत्या कारवाई केली आणि फ्लेक्स आणि बॅनर काढण्यात आले आहेत. परंतु नेहरूनगरमधील अण्णासाहेब मगर स्टेडियम परिसरात कारवाईतील साहित्यांचा ढीग साचला आहे. दुसरीकडे शहरात ‘स्वच्छता अभियान’ राबवीत असताना स्टेडियम परिसरात कचऱ्याच्या ढिगामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
शहरातील संत तुकारामनगर, नेहरूनगर, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, मोरवाडी अशा परिसरातील विविध फेरीवाला, हातगाडीधारक आणि रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईअंतर्गत विक्रेत्यांचे साहित्य जप्त जाते. त्या साहित्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असते. परंतु अतिक्रमण विभागाकडून सर्व पसारा अण्णासाहेब मगर स्टेडियम परिसरात टाकला जात आहे. कारवाई केल्यानंतर प्रशासनाने येथील राडारोडा हटविलेला नाही. हे साहित्य धोकादायक स्थितीत पडले आहे. टपऱ्या, वजनकाटा, फ्लेक्सचा ढिगचा ढीग लागला आहे.
बॅनर काढले, सांगाडे तसेच
शहरात रस्त्यावर सातत्याने फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात येतात. वारंवार हे बॅनर काढण्यात आले आहेत. मात्र, त्यांचे बांबू अजूनही तसेच आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना बांबूचा अडथळा सहन करावा लागतो.