नाशिक फाटा ते तुळापूर तीनशे सायकलपटूंचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक फाटा ते तुळापूर 
तीनशे सायकलपटूंचा सहभाग
नाशिक फाटा ते तुळापूर तीनशे सायकलपटूंचा सहभाग

नाशिक फाटा ते तुळापूर तीनशे सायकलपटूंचा सहभाग

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त इन्डो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे नाशिक फाटा ते तुळापूर अशी दरवर्षी घेण्यात येणारी ६० किलोमीटर सायकलस्वारीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यामध्ये ३०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला.

आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामधील संस्था इन्डो ॲथलेटिक्स सोसायटी यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. सर्व सहभागी सायकलस्वार सकाळी १९ तारखेला सकाळी ६ वाजता कासारवाडी नाशिक फाटा येथे जमले होते. उद्योजक अण्णारे बिरादार, डॉ. सुहास माटे, प्रकाश शेडबाले, सीए कृष्णकांत बंसल, अजित पाटील यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली.

गणेश भुजबळ यांनी तुळापूर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी माहिती दिली. एमआयटी आळंदी येथील विद्यार्थी अभिजित कडू यांनी छत्रपतींवर पोवाडा सादर केला. सर्व सभासदांनी भक्ती शक्ती निगडी - नाशिक फाटा - मोशी फाटा - चऱ्होली फाटा - आळंदी - तुळापूर - वढू असा प्रवास केला. पुणे, पिंपरी चिंचवड, नगर, नारायणगाव, उदगीर, सोलापूर तसेच, महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली.
नियोजन इंडो ऍथलेटिक सोसायटीचे गिरीराज उमरीकर, दीपक नाईक, रमेश माने, अजित गोरे, प्रमोद चिंचवडे, अविनाश चौगुले, श्रेयस पाटील, विवेक कडू, अमित पवार, प्रशांत तायडे, स्वप्नील लोढा, मदन शिंदे यांनी केले. तर, कैलास तापकीर यांनी सूत्रसंचालन केले.