
चिमण्यांनो परत फिरा रे... (फोटो फिचर)
या चिमण्यांनो परत फिरा रे
आज २० मार्च, ‘जागतिक चिमणी दिवस....’ जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा दिवस. कधीकाळी आपल्या चिवचिवाटानं माणसाचं भावविश्व समृद्ध करणारी चिऊताई आज कुठे जास्त दिसत नाहीये. त्यामुळे गेल्या दशकभरात चिमणी संवर्धनासाठी जगभरात जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. अलीकडे या प्रयत्नांच्या यशातून हळूहळू का होईना परत चिऊताईंचा किलबिलाट शहरांतून ऐकायला येऊ लागला आहे. वाढते औद्योगीकरण, शहरीकरणामुळे कमी झालेले जंगल, मोबाईल टॉवर्सची वाढलेली संख्या यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. परंतु शहरात काही ठिकाणी त्या परत याव्यात, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहे. पिंपळे सौदागरमधील रोजलॅंड सोसायटीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला ‘बर्ड हाऊस व त्यांना ठेवलेले खाद्य व पाणी जागोजागी पाहायला मिळते. त्या सोसायटीच्या आवारातील टिपलेल्या चिमण्यांची ही चित्रमय झलक.
फोटोः 31518, 31519, 31520, 31521, 31522, 31523, 31524, 31525