
‘एच३एन२’चा शहरात रुग्ण नाही
पिंपरी, ता. १ ः गेल्या चार दिवसांत इन्फ्लूएंझा ‘एच३एन२’ संसर्ग झालेला एकही रुग्ण शहरात आढळला नाही. जानेवारीपासून १४ मार्चपर्यंत सात रुग्ण आढळले आहेत. त्यातील सहा जण जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातच बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या आठवड्यात एका ज्येष्टाचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांना फुफ्फूस व ह्रदयविकाराचा त्रास होता. सध्यास्थितीत एकही रुग्ण शहरात नाही. मात्र, खबरदारी म्हणून महापालिकेने नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी व संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) या पाच रुग्णालयांत आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहेत. प्रत्येक रुग्णालयात दहा याप्रमाणे पन्नास खाटांची व्यवस्था केली आहे. औषधेही पुरेशी आहेत, अशी माहिती महापालिका सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
--