पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह साथीदार अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 
सराईत गुन्हेगारासह साथीदार अटकेत
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह साथीदार अटकेत

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह साथीदार अटकेत

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : बेकायदा पिस्तूल व गांजा बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई पुसाणे येथे करण्यात आली. मयूर अनिल घोलप (वय २९, रा. लक्ष्मीगंगा अपार्टमेंट, चिंचवडगाव, सध्या रा. पुसाणे, ता. मावळ) व शंभू संजय गंगावणे (वय २१, रा. धोंडेवाडी, पाचवड फाटा, कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पुसाणे येथे सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता मयूर यांच्याकडे एक पिस्तूल सापडले तर शंभू यांच्याकडे एक हजार २४० ग्राम वजनाचा ३१ हजार रुपये किमतीचा गांजा सापडला. मयूर हा रोकोर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा, खून करण्यासाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे असे सात गंभीर गुन्हा दाखल आहेत.