Tue, May 30, 2023

प्रेमप्रकरणावरून घरात शिरून
शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी
प्रेमप्रकरणावरून घरात शिरून शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी
Published on : 20 March 2023, 6:32 am
पिंपरी, ता. २० : तरुणाच्या प्रेमप्रकरणावरून दोन महिलांसह चौघांनी घरात शिरून जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. तरुणाच्या भावाला धक्काबुक्की केली. हा प्रकार साळुंब्रे येथे घडला. या प्रकरणी साळुंब्रे येथील एकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या भावाच्या प्रेमप्रकरणावरून चिडून आरोपी फिर्यादीच्या घरी आल्या. बेकायदा घरात शिरून शिवीगाळ करीत घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांना धक्काबुक्की करून गाडीत बसवले. दरम्यान, फिर्यादी हे पळून गेले.