महिलांनी आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर केला पाहिजे ः शिबानी बागची

महिलांनी आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर केला पाहिजे ः शिबानी बागची

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २० : तळेगाव दाभाडे येथील ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षाचे औचित्य साधत महिलांसाठी फास्ट फूड विषयक मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सत्राच्या समारोप समारंभावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मातोश्री शिबानी बागची यांनी उद्यमी प्रशिक्षणार्थी महिलांना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस फौंडेशनचे अध्यक्ष अमिन खान होते. संस्था संचालक प्रवीण बनकर म्हणाले, ‘‘श्री धर्मशाला मंजुनाथेश्वरा एज्युकेशनल ट्रस्ट, सिंडिकेट बॅंक आणि कॅनरा बॅंक संचलित ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था पुणे (रूडसेट) चे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या २५ वर्षात राज्यातील बारा हजार ५०० ग्रामीण युवक व युवतींना स्वयंरोजगाराच्या विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी आठ हजार ४५८ जणांनी स्वत:चे उद्योगव्यवसाय उभारले आहेत’’

मुंबईतील स्नेहा फौंडेशनच्या प्रमुख शिबानी बागची यांनी महिलांनी दृढनिश्चय, आत्मविश्वास आणि आपल्यातील क्षमतांचा पुरेपूर वापर केला पाहिजे. असे विचार व्यक्त केले. पाहुण्यांच्या हस्ते उद्यमी प्रशिक्षण यशस्वीपणे उत्तीर्ण केलेल्या राज्यातील ५६ महिलांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच प्रशिक्षिका सुनंदा बनुबाकोडे व प्राची कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक संदीप पाटील व हरिश बावचे, सहायक दिनेश निळकंठ उपस्थित होते. कोकिला शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. निळकंठ यांनी आभार मानले.

तळेगाव दाभाडे (स्टेशन), रूडसेट ः प्रशिक्षण संस्थेतील उद्यमी प्रशिक्षणार्थी महिलांना मार्गदर्शन करताना शिबानी बागची व अन्य मान्यवर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com