यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा रद्द करा ः आमदार जगताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची 
निविदा रद्द करा ः आमदार जगताप
यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा रद्द करा ः आमदार जगताप

यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा रद्द करा ः आमदार जगताप

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० ः शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने (रोड स्वीपर) साफसफाई करण्याच्या कामासाठी महापालिकेने विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे या प्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळाला असून स्पर्धात्मक निविदा राबवण्याची गरज आहे. सध्याच्या निविदेमुळे सात वर्षात महापालिकेला ५९ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार असल्याने निविदा रद्द करून स्पर्धात्मक निविदा प्रसिद्ध करावी, अशी मागणी आमदार अश्विनी जगताप यांनी प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
आमदार जगताप यांनी सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील रस्त्यांची यात्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध केल्यानंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या निविदापूर्व बैठकीत निविदेत नव्याने अट समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार स्वमालकीच्या दोन नग रोडस्वीपर असण्याच्या अनुभवाच्या अटीचा निविदेत नव्याने समावेश करण्यात आला. काही अधिकाऱ्यांनी विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदेत जाचक अट टाकली आहे. सुरुवातीला ती अट नव्हती. त्यावेळी ३३ निविदा प्राप्त झाल्या होत्या. आता अनेक निविदाधारक बाद झाले आहेत. ते या निविदेत सहभागी होण्यापासून वंचित राहिले आहेत. केवळ चारच ठेकेदार पात्र झाल्याचे दिसत आहे. ही निविदा रद्द करून नव्याने पारदर्शी व स्पर्धात्मक निविदा प्रसिद्ध करण्याचे आपण आदेश द्यावेत.