Thur, June 1, 2023

पिंपरी निवेदने
पिंपरी निवेदने
Published on : 21 March 2023, 9:14 am
निवेदने
खुली निबंध स्पर्धा
भोसरी येथील साई कला आविष्कार नाट्य संस्थेने नि:शुल्क खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी स्पर्धा खुली आहे. ‘भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत..!’ असा स्पर्धेचा विषय आहे. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. सर्व स्पर्धेकातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात येतील. पाच एप्रिलपर्यंत संस्थेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांच्याकडे (साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाईटस, भोसरी, पुणे- ३९) टपालाने निबंध पाठवावेत.