Wed, May 31, 2023

चौगुले, जोशी, चटणे यांना
शब्दधन पुरस्कार जाहीर
चौगुले, जोशी, चटणे यांना शब्दधन पुरस्कार जाहीर
Published on : 21 March 2023, 9:13 am
पिंपरी, ता. २१ ः शब्दधन काव्यमंचतर्फे या वर्षेचे काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांचे वितरण एप्रिल महिन्यात केले जाणार आहे. पुरस्कार्थींमध्ये लेखक निवेदक श्रीकांत चौगुले (शब्दधन प्रतिभा पुरस्कार), कवी हेमंत जोशी व सुभाष चटणे (कवी अरविंद भुजबळ पुरस्कार) यांचा समावेश आहे. ज्योती शिंदे (रोहा, रायगड) स्वप्ना जगदळे (नागपूर) दत्तात्रेय खंडाळे (पुणे), श्यामला पंडित, मयुरेश देशपांडे, अरुण कांबळे, योगिता कोठेकर (पिंपरी-चिंचवड) यांना ‘छावा काव्य पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाईल, असे शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी कळविले आहे.