भक्ती-शक्ती शिल्पानजीकचा
भूखंड जयंती, उत्सावासाठी द्या

भक्ती-शक्ती शिल्पानजीकचा भूखंड जयंती, उत्सावासाठी द्या

पिंपरी, ता. २१ ः निगडीतील भक्ती-शक्ती चौकानजीक पेठ क्रमांक २४ मधील भूखंड बिल्डरांना देऊ नये. यात्रा, उत्सव व प्रबोधनात्मक कार्यक्रमांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीने महापालिका, पीएमआरडीए, पोलिस प्रशासनाकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निगडीतील भक्ती-शक्ती चौकानजीक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला होता. शेजारील जागेत छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंतीचे कार्यक्रम होत होते. मात्र, उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर साठे यांचा पुतळा पीएमपी डेपो शेजारी स्थलांतरित केला. भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीने २०१७ पासून महापालिकेच्या सहकार्याने शिवजयंती उत्सव समूह शिल्पालगतच्या पेठ क्रमांक २४ मधील सुमारे साडेतीन एकर जागेत सुरू केला. मात्र, पीएमआरडीएने या जागेचा लिलाव केला. ही जागा बिल्डरांनी घेतली. याच जागेत १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साह झाला. त्यास महापालिका प्रशासक शेखर सिंह उपस्थित होते, त्यांना या जागेत ‘शिवसृष्टी’ उभारावी व यात्रा-उत्सवांसाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी केली. तसा प्रस्ताव सिंह यांनी तयार केला असून, तो पीएमआरडीएला पाठवला जाणार आहे. पीएमआरडीएचे आयुक्त व खासदार श्रीरंग बारणे यांनाही समितीने शिवसृष्टी व इतर सार्वजनिक प्रकल्पासाठी जागा देण्याबाबत पत्र दिले आहे. जागेची लिलाव प्रक्रिया संपूर्ण रद्द करून बिल्डरांनी काम थांबवावे व महापालका अथवा पीएमआरडीएने शिवसृष्टी व इतर प्रकल्प विकसित करावेत, अशी मागणी केली आहे. काम थांबविण्याबाबत माजी नगरसेवक मारुती भापकर, सचिन चिखले, प्रमोद कुटे, प्रकाश जाधव, लक्ष्मण रानवडे, धनाजी यळकर पाटील, सागर तापकीर, सचिन काळभोर, गणेश भांडवलकर, सागर लष्करे, रोहिदास शिवनेकर, किरण रणखांबे, अशोक शिंदे, संतोष वाघे आदींनी निगडी पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. त्यात काम न थांबवल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनाही निवेदन दिले जाणार असल्याचे भापकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com