वीज समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे
वीज समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे

वीज समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत औद्योगिक आणि घरगुती वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी
महावितरण प्रशासनाने पायाभूत सुविधा सक्षम कराव्यात. तसेच प्रस्तावित प्रकल्प आणि विकासकामे मार्गी लावावीत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदारसंघात औद्योगिक आणि निवासी अशा दोन्ही पट्ट्यातील वीज ग्राहकांना नियमितपणे वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समाविष्ट गावांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून, त्या तुलनेत वीज यंत्रणा सक्षम करण्यात आलेली नाही. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही विकासकामे तत्काळ मार्गी लावणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडे काही कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास ही कामे मार्गी लावता येतील.
प्रस्तावित कामांमध्ये प्राधान्याने सफारी पार्क मोशी व चऱ्होली अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात यावे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

भोसरी उपविभागाचे दोन उपविभाग होणार
भोसरी विभागांतर्गत भोसरी एमआयडीसी तसेच सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. औद्योगिक, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी कुशल प्रशासकीय नियंत्रणासाठी भोसरी उपविभागाचे दोन उपविभाग करणे गरजचे आहे. भोसरी उपविभाग क्र. १ अंतर्गत भोसरीगाव शाखा, नाशिकरोड शाखा कार्यालय आणि चऱ्होली शाखा कार्यालय स्थापन करणे आवश्यक आहे. भोसरी उपविभाग क्र. २ अंतर्गत इंद्रायणीनगर शाखा कार्यालय (नवीन प्रस्तावित), मोशी शाखा कार्यालय, आकुर्डी उपविभाग अंतर्गत चिखली शाखा कार्यालय (नवीन प्रस्तावित) उभारण्याची आवश्यकता आहे. या बाबत ऊर्जामंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महावितरण पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला गती मिळेल, अशी अपेक्षा आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.