
सिटीजन जर्नालिस्ट
महापालिकेचे गृहप्रकल्प बांधून धूळखात
२०१४ पासून देशाचे पंतप्रधान घोषणा करीत आहेत की, २०२२ पर्यंत सर्वांना घरे मिळणार. परंतु २०२२ उलटून गेले आहे. महापालिकेच्या हद्दीत कोणालाच घरकुल मिळालेलं नाही. महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत चऱ्होली व बोऱ्हाडेवाडी तसेच, मोहन नगर, उदयोमनगर येथे गृहप्रकल्प बांधून तयार आहेत. मात्र, अद्याप एकाही लाभार्थ्याला घरकुलाचे वाटप केलेलं नाही. रावेत, चिखली, डुडुळगाव याठिकाणी गृहप्रकल्पाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरु झालेले नाही. त्यामुळे, घरकुल लाभार्थ्यांची घोर निराशा झाली आहे.
प्रदीप गायकवाड, पिंपळे गुरव
--
ांासंप करून सरकारला वेठीस धरणे चुकीचे
दररोज संप, मोर्चा, धरणे चालूच आहेत. वास्तविकता ही आहे की, या समस्या आधीही होत्या. परंतु, केवळ हे सरकार काही करत नाही. म्हणून वेठीस धरणे हाच उद्देश असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांत हे कोणाला सुचले नाही. जनतेने याचा विचार करावा.
- कमलाकर कुलकर्णी, चिंचवड
--
रावेत मधील वीटभट्ट्यांचा रहिवाशांना त्रास
दहा-बारा वर्षापूर्वी रावेतमध्ये बऱ्याच वीटभट्टया होत्या व नागरी वस्ती कमी होती. पण, आज रावेतमध्ये भरमसाट रहिवासी सदनिका झाल्या आहेत. या वीट भट्ट्यांच्या चारही बाजूला या सदनिका वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत या वीट भट्ट्या येथून स्थलांतरित करणे गरजेचे होते. पण, असे झाले नाही. हे सर्व सदनिकाधारक वीट भट्ट्यांच्या अपायकारक धुरामुळे त्रस्त झाले आहेत. अबालवृद्ध छातीच्या आजाराने, सततची घशाची खवखव इत्यादी आजारांनी ग्रासलेले आहेत. सदनिकेच्या सज्जा आणि खिडक्या सुद्धा उघडू शकत नाहीत. महापालिकेने यावर कार्यवाही करून या वीटभट्ट्या त्वरित रहिवासी प्रांतापासून दूर स्थलांतरित कराव्यात.
- समीर पाटील, रावेत
--
कृष्णानगरमध्ये जॉगिंग ट्रॅकवर दारूचा अड्डा
कृष्णानगर जुन्या भाजी मंडई जागी जॉगिंग ट्रॅक बनवण्याचे काम सुरू आहे. त्या जागी दिवसाढवळ्या मद्यपी सर्रास समोरील दारू दुकानातून दारू विकत आणून पीत बसतात. महापालिका व पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
- एक वाचक