वडमुखवाडी- चऱ्होलीतील मंदिरात
विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्राणप्रतिष्ठा

वडमुखवाडी- चऱ्होलीतील मंदिरात विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्राणप्रतिष्ठा

पिंपरी, ता. २१ ः चहोली-वडमुखवाडी येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. श्री विठ्ठल-रुख्मिणीसह राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. काकड आरती, होमहवन, महाअभिषेक, परिपाठ पठण झाले. सद्‍गुरू प्रासिदिक व गणेश महिला मंडळाने भजन सेवा केली. उत्तम महाराज बढे, गणेश महाराज खेडकर यांचे कीर्तन झाले. स्वरुपा तोडकर यांचे भजन गायन झाले. भैरवनाथ, श्रीराम, पद्मावती व पांडुरंग भजनी मंडळाने जागर केला. भागवताचार्य संजयमहाराज हिवराळे यांचे काल्याचे कीर्तन झाले. वडमुखवाडी ग्रामस्थ, पद्मावती देवस्थान ट्रस्ट, पद्मावती भजनी मंडळ, पद्मावती देवस्थान उत्सव समिती यांनी संयोजन केले. शांताराम तापकीर, ज्ञानेश्वर गिलबिले, ॲड. कुणाल तापकीर, रामेश्वर तापकीर, धनंजय तापकीर, मधुकर तापकीर, वसंतराव तापकीर, बाळासाहेब तापकीर यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com