मिळकतकर थकबाकीदारांमध्ये
माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश

मिळकतकर थकबाकीदारांमध्ये माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश

पिंपरी, ता. २१ ः मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे. त्यात जप्ती, जप्ती केलेल्या साहित्याची विक्री यांसह मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांच्या नावांची वृत्तपत्रांतून प्रसिद्धी केली जात आहे. यामध्ये महापालिकेच्या चाळीस वर्षांच्या वाटचालीतील काही माजी नगरसेवकांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे.
महापालिकेने चालू वर्षात एक हजार कोटी रुपये थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वसुली केली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत सातशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची वसुली झाली आहे. मिळकतकर भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सर्व करसंकलन कार्यालये खुली ठेवली जात आहेत. शास्ती माफीचा लाभ घेण्यासाठी मिळकतकराची मूळरक्कम एकरकमी भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या एक लाखांपेक्षा अधिक थकबाकीदारांच्या नावाची यादी वर्तमानपत्र व महापालिका संकेतस्थळावर गेल्या आठवड्यापासून प्रसिद्ध केली जात आहे. मिळकतकर विभागाच्या सतरा विभागीय कार्यालयनिहाय याद्या तयार केल्या आहेत. त्यामध्ये काही माजी नगरसेवकांची व मोठमोठ्या कंपन्यांचीही नावे आहेत. करसंकलनासाठी प्रबोधनात्मक अभियानही राबविले आहे. झिरो टॉलरन्स पॉलिसीची अंमलबजावणी केली जात आहे. १३ हजार नोटीस दिल्या असून बाराशेपेक्षा अधिक थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com