दाखल गुन्हे ठरतायेत पासपोर्ट व्हेरिफिकेशला अडथळे

दाखल गुन्हे ठरतायेत पासपोर्ट व्हेरिफिकेशला अडथळे

पिंपरी, ता. २२ : परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. मात्र, एखाद्यावर गुन्हा दाखल असल्यास पासपोर्ट मिळण्यास अडथळा निर्माण होतो. गुन्हे दाखल असल्याचा अहवाल पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयाला पाठविल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले. परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून त्यासाठी पासपोर्ट घेणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. पिंपरी- चिंचवड मध्ये १५ ऑगस्ट २०१८ मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर सप्टेंबरपासून पासपोर्ट विभाग सुरु झाला. २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील ६५ हजार २५४ जणांचे अर्ज पोलिस व्हेरिफिकेशनसाठी प्राप्त झाले. यातील ७७५ जणांवर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
----------
अशी असते प्रक्रिया
पासपोर्ट कार्यालयात अर्ज केल्यानंतर पोलिस व्हेरीफिकेशनसाठी ती फाइल संबंधित अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी म्हणजेच पोलिस व्हेरिफिकेशनसाठी पोलिसांकडे येते. येथे सीसीटीएनएस सिस्टीमसह इतर माध्यमातूनही अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाते. गुन्हा दाखल असल्यास तसा अहवाल पोलिसांकडून पासपोर्ट कार्यालयाला पाठवला जातो. त्यामुळे पासपोर्ट मिळत नाही. त्यानंतरही पासपोर्ट आवश्यक असल्यास न्यायालयात जावे लागते. विशेष परवानगी घ्यावी लागते. न्यायालयाच्या आदेशानुसार पासपोर्टची परवानगी मिळते. मात्र, न्यायालयाकडूनही मर्यादित कालावधीच्या पासपोर्टसाठीच परवानगी दिला जाते. अनेकांना परवानगी नाकारलीही जाते.
----------------------------
कायदा हातात घेतल्याचे परिणाम
कायदा हातात घेत गुन्हा केला जातो. मात्र, याचे परिणाम भविष्यात अडथळे निर्माण करू शकतात , याचे भान अनेकांना नसते. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यासह शिक्षाही भोगावी लागते. यासह नोकरीवेळी, पासपोर्ट घेताना अथवा इतर महत्त्वाच्या कामासाठी अडचणीचे ठरते.
---------------------------
वर्ष प्राप्त अर्ज
२०१८ (सप्टेंबर ते डिसेंबर) २३ हजार ३२८
२०१९ ४० हजार २९३
२०२० ३२ हजार ६६४
२०२१ ४५ हजार ८१४
२०२२ ६५ हजार २५४
-------------------------------

एखाद्यावर गुन्हा दाखल असल्यास आम्ही त्याबाबतचा अहवाल पासपोर्ट विभागाला पाठवतो. यामुळे पासपोर्ट मिळण्यास अडचण निर्माण होते. दरम्यान, आपल्याकडून कोणताही गुन्हा घडणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. अन्यथा ही बाब भविष्यात अडचणीची ठरते.
- नितीन लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पासपोर्ट विभाग, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com