तळवडेत डीअर पार्कऐवजी बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळवडेत डीअर पार्कऐवजी 
बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार
तळवडेत डीअर पार्कऐवजी बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार

तळवडेत डीअर पार्कऐवजी बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः इंद्रायणी नदीच्या परिसरातील तळवडे गायरानात डीअर सफारी पार्क उभारण्याचा प्रस्ताव पंधरा वर्षांपासून आहे. त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मात्र, त्या आरक्षणात आता बदल करून, डीअर पार्क ऐवजी बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आरक्षण करण्याबाबतचा निर्णय महापालिका स्थायी समिती सभेने घेतला.
महापालिका भवनात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. त्यात आरक्षणाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. डीअर पार्क करण्याबाबतचा अभिप्राय वनविभागाला महापालिकेने मागितला होता. त्यांचा नकारात्मक अभिप्राय आल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी सदर जागेची पाहणी केली व आरक्षणच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. बायोडायव्हर्सिटीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकारी प्रशासकांना देण्यात आले आहेत.

औद्योगीकरणामुळे नकार
तळवडेतील आरक्षणात डीअर पार्क (हरिण पार्क) उभारण्यास वनविभागाने नकार दर्शविला आहे. या परिसरात औद्योगिक परिसर वाढत असून भविष्यात मानवी हस्तक्षेप वाढू शकतो. तो हरणासारख्या प्राण्यांसाठी पोषक राहणार नाही, असे अभिप्राय वनविभागाने दिला आहे.

अन्य मंजूर विषय
- महापालिका शाळेतील शिक्षकांच्या जबाबदारी निश्चित करणे
- कृष्णानगर येथील क्रीडांगण विकसित करून चालविण्यास देणे
- हिंजवडी शिवाजी चौक ते विठ्ठल मंदिर रस्ता मजबूत करणे
- माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणे
- विविध ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारून चालविण्यास देणे
- अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता पदांच्या निकषात बदल
- झोपडपट्टी पुनर्वसन लिंकरोड प्रकल्पातील विविध कामे करणे
- सांगवी फाटा भुयारी मार्गाजवळील मुळा नदीवर पूल बांधणे
- ----