Sun, June 4, 2023

अण्णासाहेब पाटील यांना
पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
अण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
Published on : 23 March 2023, 3:00 am
पिंपरी, ता. २३ ः माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या केएसबी चौकातील पुतळ्यास महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विशेष अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सचिव हनुमंत तरडे, सामाजिक कार्यकर्ते संपत धोंडे, शंकर निकम, किशोर सातकर, लहू पवार आदी उपस्थित होते. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
--