संगणक अभियंता तरुणीची 
२२ लाखांची फसवणूक

संगणक अभियंता तरुणीची २२ लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. २३ : नोकरीचे आमिष दाखवत वेगवेगळ्या लिंक पाठवून त्या लाईक करायला सांगत संगणक अभियंता तरुणीची २१ लाख ९५ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार वाकड येथे घडला. संबंधित तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अलयाना फ्रॉम ग्लोबल चॅट कंपनीसह एका मोबाईल धारकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी तरुणी हिंजवडी आयटी पार्कमध्ये एका कंपनीत संगणक अभियंता आहे. तरुणीला फोनवरून संपर्क साधला. पार्ट जॉब देतो असे सांगत युट्युबवर व्हिडिओ लाईक केल्यानंतर पैसे खात्यात जमा होतील, असेही सांगितले. तरुणीला वेगवेगळ्या लिंक शेअर केल्या. त्या त्यांनी लाईक केल्या असता त्यांच्या खात्यात एक हजार ५०० रुपये जमा झाले. आरोपींनी तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आणखी काही टास्क असून ते तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात टास्कप्रमाणे पैसे जमा होतील, असे सांगितले. त्यानुसार तरुणीने टास्क पूर्ण केल्या. त्यानंतर आरोपींनी आणखी टास्क पूर्ण करावे लागतील. तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, असे खोटे सांगून तरुणीची २१ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com